धरणगाव, प्रतिनिधी । शहरात मागील गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती.तरी त्यात शहरातील मातोश्री नगर परिसरालगत असलेल्या हामाल वाड्यातील घरांमध्ये पाणी शिरून घरातील संसारोपयोगी सामान व इतर साहित्याचे बरेचसे नुकसान झालेले आढळून आले.
या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आज प्रसिद्ध लेखक, साहित्यिक, कवी प्रा. बी एन चौधरी सर व सामाजिक कार्यकर्ते अनिल बडगुजर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने, शिवसेना शाखा धरणगाव तर्फे पिडीत कुटुंबाला ससांर उपयोगी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले,
सदर कार्यक्रमा जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख माननीय श्री. गुलाबरावजी वाघ व उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
तसेच शहरातील नामवंत 105 वर्षांची परंपरा असलेली प.रा विद्यालयातील विद्यार्थीप्रिय अभिव्यक्ती माजी मुख्याध्यापक व प्रसिद्ध कवी, व्यंगचित्रकार प्रा. बी एन चौधरी सर तसेच सामाजिक तरुण, कोणत्याही कामात अग्रेसर असणारे कार्यकर्ते अनिल बडगुजर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संबंधित गरजूं कुटुंबाना किराणा साहित्याचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गुलाबराव वाघ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करताना महामहीम तात्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मार्मिक व्यंगचित्रकार गौरविण्यात आले त्या आठवणींना उजाळा देण्यात आला, आभार मानतांना प्रा. चौधरी म्हणाले कि, कुटूंबामधे तर वाढदिवस साजरा होतो पण माझ्या सारख्या सामान्य शिक्षकाचा एखादी संघटना ज्यांचा संसार उद्ध्वस्त झाला अशा लोकांना माझा हस्ते एक महिना पुरेल एवढा किराणा दिला याचापेक्षा आनंदाचा दुसरा क्षणच असु शकत नाही.
या कार्यक्रमाला गटनेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास महाजन, भागवत चौधरी, अजय चव्हाण, अहमद पठाण, जितेंद्र धनगर, त्याचप्रमाणे तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, विभाग प्रमुख संजय चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन किरण मराठे, योगेश पाटील, तोसिब पटेल, वाल्मीक पाटील, विनोद महाजन, गोपाल पाटील, गोपाल चौधरी,यांनी केले. किराणा साहित्य आणुन गरजु लोकांना पोहचविण्यासाठी अरविंद चौधरी, योगेश पाटील ,पवन पाटील, किशोर पाटील, सोनू पटेल, महेंद्र चौधरी इत्यादी शिवसैनिकांनी मदत केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले, आभार प्रदर्शन शहरप्रमुख नगरसेवक राजेंद्र महाजन व किरण अग्नीहोत्री यांनी मानले. धरणगाव शिवसेना आपल्या सोबत कायमच आहे. आम्ही आपले अश्रू पुसणारच ! आता फक्त रडायचे नाही तर लढायचे सुद्धा आहे येत्या काळात अजून योग्य ती मदत निश्चितपणे करण्याच्या प्रयत्न करू असे जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ म्हणाले.