मेष:- धार्मिक कामात मदत कराल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल. सामुदायिक गोष्टींमध्ये अडकू नका. सहकार्यांशी सलोख्याने वागावे.
वृषभ:- किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ मिळवाल. रेस, जुगारापासून दूर राहावे.
मिथुन:- गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका. शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. बौद्धिक हटवादीपणा दाखवाल. आभ्यासू दृष्टीकोन ठेवाल.
कर्क:- कलात्मक आनंद शोधावा. विषयाच्या मुळाशी जाऊन पहावे. तुमच्या विरोधात काही व्यक्ति वागू शकतात. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
सिंह:- लहान मुलांच्यात वावराल. जवळचे मित्र भेटतील. अधिकारी लोकांच्या ओळखी होतील. मनाचा विचार महत्त्वाचा ठरेल. रेस, जुगार यांपासून दूर राहावे.
कन्या:- अपेक्षित ध्येयासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. नातेवाईकांची मदत घेता येईल. थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल.
तूळ:- प्रवासात चोरांपासून सावध राहावे. भावंडांशी गैरसमजाचे प्रसंग येऊ शकतात. चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वृश्चिक:- पराचा कावळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कौटुंबिक वातावरण कलुषित होऊ शकते. रागाला आवर घालावी लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. संयम बाळगावा लागेल.
धनू:- आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. मनात विचारांचा गुंता वाढवू नका. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. कौटुंबिक वातावरण तप्त राहू शकते. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
मकर:- दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. मनातील संभ्रम टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रमंडळी जमवून वेळ आनंदात घालवा. प्रेमसंबंधाची व्यापकता वाढेल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.
कुंभ:- शारीरिक ऊर्जेची बचत करावी लागेल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
मीन:- तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल. गोष्टी व्यवस्थित समजून मग वागावे. कौटुंबिक अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. कामाच्या ठिकाणी चोख राहावे लागेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.