जळगाव, प्रतिनिधी । महाबळ मंडल क्र. ९ मध्ये आज भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते सुरसिंग पाटील व मुकुंदा विसपुते यांच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेविका सुरेखा तायडे, गायत्री राणे, मंडल सरचिटणीस संजय तिरमले, प्रभाग समिती सदस्य संजय विसपुते, भूपेश कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, प्रथम पाटील, शाम पाटील, संतोष डाबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.