जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागातून तरुणाचा मोबाईल घेऊन अज्ञात दोघे चोरट्यांनी मोटारसायकलने येऊन पसार केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील रहिवाशी दिपक वाल्मिक मोरे (वय-२७) हा तरूण शहरातील भक्ती हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉय म्हणून नोकरीला आहे. २० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दिपक हा नुतन मराठा महाविद्यालय परिसरात असलेले रोझ गार्डनमध्ये बसलेला असतांना दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आले. त्यातील एकाने दिपकच्या हातातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. आराडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघेजण दुचाकी घेवून पसार झाले होत.
दिपक मोरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.