जळगाव – वाढदिवस साजरा न करता गोर गरिबांना एक वेळ चे जेवण राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीची जिल्हा उपाध्यक्षा दीपिका भामरे हिने वाढदिवस साधे पणाने साजरा केला.
मागील २ वर्षांपासून कोरोना या महामारीमुळे सर्वांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अशा वेळेस वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा न करता या निमिताने एक वेळच जेवण गरजू ,गरीब लोकांना देण्याचे ठरून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीची जिल्हा उपाध्यक्षा दीपिका भामरे यांनी शिरसोली रस्त्यावर राहणारे गरीब लोकांना जेवण दिले.