जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद गावातील आज सकाळच्या सुमारास ६०० किलो वजनाचे ढोरांचे मांस आढळून आले असून यात दोन जणांना नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याप्रकरणी त्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नशिराबाद गावातील कसाईवाडा येथे आज पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास असलेल्या मोकळ्या जागेवर अंदाजे 600 किलो वजनाचे गुरांचे मांस आढळून आले. या प्रकारामुळे नशिराबाद गावात खळबळ उडाली होती दरम्यान नशिराबाद पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन 90 हजार रुपये किंमतीचे सहाशे किलो वजनाचे गुरांचे मांस जप्त करण्यात आले.
या गुन्ह्याप्रकरणी संशयित आरोपी जावेद खान दाऊद खान (वय-२३) आणि इमरान शेख सरदार (वय-२४) दोन्ही रा. कसाईवाडा नशिराबाद ता.जि.जळगाव यांना अटक केली आहे. तर पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण टाके यांच्या फिर्यादीवरून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण करीत आहे.