Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे निराधार महिलांना मिळणार रोजगार (व्हिडिओ) 

सात महिलांना शिलाई मशीन वाटप; गरजू कुटुंबाला मिळाला दिलासा

by Divya Jalgaon Team
June 14, 2021
in जळगाव, सामाजिक
0
रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे निराधार महिलांना मिळणार रोजगार (व्हिडिओ) 

जळगाव – रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत रोटरी जळगाव रॉयल्सची स्थापना नुकतीच झाली असून रोटरी इंटरनॅशनल तर्फे मान्यता प्रमाणपत्र [क्लब क्रमांक २२२६३२] २१ मे २०२१ रोजी प्राप्त झाले आहे. प्रथम प्रकल्प म्हणून रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे कोरोनाच्या कालावधीत रोजगार बुडालेल्या व निराधार महिलांना सात शिलाई मशीनचे वाटप नगरसेवक अनंत जोशी यांच्या हस्ते ओंकारेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात रविवारी सकाळी करण्यात आले.

या उपक्रमामुळे गरजू महिलांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना कपडे शिलाई कामातून घरबसल्या रोजगार उपलब्ध होईल. कोरोनाच्या कालावधीत दवाखान्यातील खर्चामुळे रुग्णांचे कुटुंब कर्जबाजारी झाले बर्‍याच महिलांचा सुद्धा रोजगार बुडाला. त्यामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्ज फेड व मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्‍न निर्माण झाला. आता या महिला कपडे शिवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकता. या उपक्रमाच्या माध्यमातून सात महिलांच्या कुटुंबाला नवसंजीवनी लाभणार आहे. कोविडच्या कालावधीत राबवलेल्या या उपक्रमामुळे समाजात चांगला संदेश जाईल, असे मत नगरसेवक अनंत जोशी यांनी व्यक्त केले.

समाजाभिमुख उपक्रमांवर भर
रोटरी जळगाव रॉयल्स व या उपक्रमांची माहिती अध्यक्ष स्वप्निल जाखेटे यांनी दिली. भविष्यातही निराधार महिलांच्या रोजगारासाठी आणखी काही शिलाई मशीनचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महिलांनी या मशीनचा योग्य उपयोग करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. या कामातून मिळणार्‍या पैशांमुळे कुटुंबाचा आर्थिक भार हलका होण्यास मदत होईल, असे मत सुधा काबरा यांनी व्यक्त केले. सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्‍वासन या प्रकल्पाचे प्रायोजक, डिझाइन कन्सेप्टचे गोविंद वर्मा
यांनी दिले. समाजाभिमुख उपक्रमांवर अधिक भर देण्यात येईल, अशी ग्वाही प्रोजेक्ट चेअरमन शरद जोशी यांनी दिली. सूत्रसंचालन मानद सचिव सचिन जेठवाणी यांनी केले. तर जनसंपर्क प्रमुख विजय लाठी यांनी आभार मानले. या मदतीमुळे दिलासा मिळाल्याच्या भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या. या वेळी जुगल जोशी, डॉ.जयदीप छाबडा, भरत पटेल, अमृत पटेल, सचिन खडके, पिंकी मंधाण, नारायण लाहोरी अनिल आडवाणी आदी उपस्थित होते.

Share post
Tags: # Divya Jalgaon latest news#Rotary Jalgaon RoyalJalgaon newsरोटरी जळगाव रॉयल्सतर्फे
Previous Post

बाईचा जन्म सहन करण्यासाठीच,असे मानणे हे सर्वात मोठे सामाजिक प्रदूषण.. डॉ. राणी बंग

Next Post

युवासेने तर्फे आदित्य उत्सवाला सुरुवात ३ हजार वृक्षांची होणार लागवड

Next Post
युवासेने तर्फे आदित्य उत्सवाला सुरुवात ३ हजार वृक्षांची होणार लागवड

युवासेने तर्फे आदित्य उत्सवाला सुरुवात ३ हजार वृक्षांची होणार लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group