जळगाव – पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा युवासेनेतर्फे आदित्य उत्सव अंतर्गत वृक्षारोपण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
१४ ते २० जून दरम्यान जळगाव शहर, चिंचोली, उमाळा, धानवड, कंडारी, कुसुंबा, देव्हारी या गावांमध्ये ३ हजार वृक्षांची लागवड होणार आहे. उत्सवाची सुरुवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आंबा व कडू निंबाचे रोपे लावून करण्यात आली.
या वेळी युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, शिवसैनिक विराज कावडीया, युवासेना महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, अमित जगताप, नवलसिंग पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड उपस्थित होते.