जळगाव – रोटरी क्लब जळगाव मीडटाऊन तर्फे साने गुरुजी यांची पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शाळेला लायब्ररीसाठी १२५ पुस्तकांचे वाटप करण्यात आले असून यात मुख्यता प्रेरणादायीकथा, गाणी, गोष्टी व शैक्षणिक पुस्तके देण्यात आली असून कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी वर्धिष्णू या संस्थेतर्फे ही शाळा चालवली जाते त्यामुळे या उपक्रमास आर्थिक योगदान रो.शेखर प्रभुदेसाई , डॉक्टर अपर्णा मकासरे, डॉक्टर रवी महाजन यांनी केले .
वर्धिष्णू या संस्थेचे अध्यक्ष अद्वैत दंडवते व प्रणाली दंडवते यांनी या उपक्रमाबद्दल सर्व दात्यांचे व क्लबचे देखील आभार मानले या कार्यक्रमास अनिल एम अग्रवाल, शंकर भाई पटेल, डॉ. विवेक वडजी , तारीख शेख , अनिल डी अग्रवाल ,सचिव शशी अग्रवाल, अध्यक्ष डॉ. रेखा महाजन इत्यादी सदस्यांची उपस्थिती होती. प्रकल्पप्रमुख अनिल एम अग्रवाल यांची देखील यावेळी उपस्तीथी लाभली.