जळगाव – विधी सेवा उपसमिती, उच्च न्यायालय, औरंगाबाद आणि अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, जळगाव यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरते न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे फिरते न्यायालय जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दि १५ ते २८ जून, २०२१ पर्यंत कार्यरत राहणार आहे. फिरते न्यायालय हे खेडोपाडी जाऊन प्रलंबित तसेच वादपुर्व प्रकरणी आपसात तडजोड करुन प्रकरणे निकाली काढणार आहे. त्याचबरोबर विधी सहाय्य व लोक अदालतीबाबत जनतेत जनजागृती करणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपली तडजोड योग्य प्रकरणे फिरत्या न्यायालयाच्या अनुषंगाने निकाली काढुन वेळ व पैशाची बचत करावी. असे आवाहन अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.