जळगाव – येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे आर्ट ऑफ लिव्हिंग, टेमसेक फोंडेशन व आयएएचव्ही या संस्थानकडून प्राप्त झालेले ६० हजार ‘थ्री’ लेअर मास्क मंगळवारी सुपूर्द करण्यात आले.
महाराष्ट्रासाठी या तिन्ही संस्थांमार्फत २० लाख मास्क पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या व्यक्तींना वितरण करण्यासाठी देण्यात आले आहेत.
जळगाव जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील विविध कोविड केअर सेंटर, शासकीय रुग्णालयांमध्ये व शासकीय वैद्यकीय व्यवस्थेमध्ये तसेच पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या कोरोना योद्धांना देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, टेमसेक फौंडेशन, आयएएचव्हि या संस्थांनी ६० हजार मास्क शासकीय वैद्यकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त मास्क हर्षाली चौधरी, नरेंद्र पाटील, चेतन वाणी, धनराज कासट यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन. एस.चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले.