जळगाव – महाराष्ट्रातील एकमेव राजकारण विरहित तथा सर्व शैक्षणिक शाखांना घेऊन राज्यभरात कार्य करणाऱ्या संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी तालुक्यातील नंदगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शांताराम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम, प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे यांनी खान्देश विभाग महासचिव तोषिश पाटील यांच्या शिफारशीने सर्वानुमते ही निवड केली. सोनवणे यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली असून विद्यार्थी हितासाठी भविष्यात संघटनेच्या माध्यमातून विविध चळवळी तथा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही यावेळी स्वप्निल सोनवणे यांनी दिली. सोनवणे हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. या निवडीबद्दल सोनवणे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.