जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे म्यूकरमायकोसिस सदृश पांढऱ्या बुरशीसारखा आजार असलेल्या महिला रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर बुधवारी ९ रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज कार्ड देऊन निरोप देण्यात आला. या महिलेला म्युकरमायकोसिस च्या पांढऱ्या बुरशीचा गंभीर आजार होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
जळगाव तालुक्यातील भोकर येथील ३० वर्षीय महिला म्यूकरमायकोसिस सदृश आजारामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २६ मे रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. येथे महिलेच्या आजाराचे निदान केल्यावर तिला पांढऱ्या बुरशीचा आजार असल्याचे समजले. सोबत ७ वर्षापासूनच क्षयरोग व फुफुस काम करीत नसल्याचे वैद्यकीय पथकाला दिसून आले. श्वास घेण्यास हि त्रास होता . त्यामुळे तातडीने औषधोपचार करून १५ दिवसांत महिलेला अराम मिळाला.
महिलेवर उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ बी डी नाखले, सहयोगी प्रा डॉ विजय गायकवाड, डॉ आस्था गनेरीवाल, डॉ नेहा चौधरी, डॉ स्वप्निल चौधरी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. रोहन केळकर, डॉ. शाल्मी खानापूरकर, कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, डॉ. किरण अहिरे, नेत्र शल्य चिकित्सा विभागाचे डॉ. अंजली सिंग, दंत शल्य चिकित्सा विभागाच्या डॉ. श्रुती शंखपाल आदी सह वार्ड इन्चार्ज परिचारिका रोजमेरी वळवी, शामल चौधरी, आकाश गायकवाड, तेजस नेमाडे, कक्षसेवक नितीन जगताप, राजेंद्र सूर्यवंशी, चेतन सरोदे, पूजा बऱ्हाटे, प्रतीक्षा साबळे, अश्विनी सैंदाणे आदींनी उपचार करण्याकामी परिशम घेतले.
महिलेला बुधवारी ९ जून रोजी अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी महिलेने रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.