Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार

नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर

by Divya Jalgaon Team
June 6, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार

kishor appa patil

पाचोरा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासना अंतर्गत नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या अनुदानातून पाचोरा नगरपरिषदेस शहरातील विविध भागात सौर दिवे लावण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून यामुळे शहर सौर दिव्यांनी उजळून निघणार आहे. यामुळे पालिकेच्या वीज बिलात देखील बचत होणार असून रात्री अपरात्री अचानक जाणाऱ्या विजेमुळे शहरात अंधार न होता सौर दिव्यांमुळे लखलखाट कायम राहणार आहे.

सदर कामासाठी १०० टक्के हिस्सा राहणार असून त्वरित कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम शहरातील तलाठी कॉलनी, व्हाआयपी कॉलनी, जुना अंतुली रोडचा कॉलनी भाग, एम आय डी सी कॉलनी, गाडगेबाबा नगर,भास्कर नगर, विकास कॉलनी, संघवी कॉलनी, बाजोरिया नगर, स्टेट बँक कॉलनी, मानसिंगका कॉलनी, जय किसान कॉलनी, जयराम कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, दत्त कॉलनी, आनंद नगर, चिंतामणी कॉलनी, जिजामाता कॉलनी,भवरलाल नगर, आशीर्वाद रेसीडनसी, आशीर्वाद कॉटेज, ड्रीम सिटी, गणेश कॉलनी, थेपडे नगर, विवेकानंद नगर, बळीराम पाटील नगर, मिलिंद नगर, हनुमानवाडी, पंपिंग रोड लगतचा कॉलनिभाग, डाक बंगल्या जवळचा कॉलनी भाग, देशमुख वाडी, संभाजी नगर, बाहेरपुरा, आठवडे बाजार, मच्छी बाजार माहिजी रोड भाग श्रीराम चौक रंगार गल्ली गांधी चौक सोनार गल्ली,कोंडवाडा गल्ली, मुल्ला वाडा, बोहरी गल्ली, मुस्लिम वस्ती, दलित वस्ती, कृष्णापुरी, त्रंबक नगर, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, शिवाजी नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, शिवाजी चौक, व शहरातील इतर छोटे मोठे कॉलनी भागात स्ट्रीट लाईट पोल बसविले जाणार आहेत.

सदर निधीच्या मंजुरी साठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले असून नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीतजास्त चांगल्या सेवा नागरिकांना प्रदान केल्या जात असल्याबद्दल त्यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे दरम्यान नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Share post
Tags: #Divya Jalgaon Marathi newsaamdar patilkishor appa patil pachorastreat lightसौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार
Previous Post

परिचारिकांनी संवेदनशील असायला पाहिजे; पोलिस अधीक्षक मुंढे

Next Post

हाजी गफ्फार मलिक यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्काराकरिता महासभेत प्रस्ताव मांडणार: महापौर

Next Post
हाजी गफ्फार मलिक यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्काराकरिता महासभेत प्रस्ताव मांडणार: महापौर

हाजी गफ्फार मलिक यांना 'जळगाव रत्न' पुरस्काराकरिता महासभेत प्रस्ताव मांडणार: महापौर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group