जळगाव – अवघ्या जगाला लढाऊ वृत्तीची शिकवण देणारया छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजचा शिवराज्याभिषेक दिन ‘लोकसंघर्ष मोर्चा’तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
आदर्श राज्य प्रस्थापित करून जनसामान्यांच्या जीवनात चेतना निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाजवळील पुतळ्याला माल्यार्पण मानवंदना देण्यात आली.
महाराज शेकडो वर्षानंतर सुद्धा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत. शिवाजी महाराजांचा पराक्रम ध्यानात ठेऊन आपणही जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढायला हवे, असे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी केले. यावेळी समवेत सचिन धांडे, योगेश पाटील, प्रमोद पाटील, भरत कर्डिले, प्रणव पवार, अक्षय निकम, प्रतिक जोशी, सागर पाटिल, नरेंद्र पाटिल, नविन चावला इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.