Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवार पासून दिले नवीन आदेश

जाणून घ्या काय राहणार सुरु व काय बंद

by Divya Jalgaon Team
June 6, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी

collecter

जळगाव – राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार सोमवारपासून नवीन आदेश

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केलेले नवीन आदेश
* सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच दुकानात एका वेळी पाच पेक्षा ग्राहक नसावेत याची काळजी घ्यावी लागेल. दुकानाच्या दर्शन भागामध्ये बँकेप्रमाणे काऊंटर लाऊन काच अथवा प्लास्टीकची पारदर्शक शीट लावावी लागणार आहे. यात फक्त विक्री होणारी वस्तूच जाऊ शकेल इतका भाग खुला ठेवावा लागेल. तर दुकानाच्या आतील काउंटरमध्ये फेस शील्ड अनिवार्य च्या वापर करणे बंधनकारक राहील.

*शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील.

* हॉटेल, रेस्टोरेंट,बार सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील.

* सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग व मॉर्निंग वॉक सुरू राहतील.

* सर्व खासगी कार्यालये नियमित वेळ खुली राहतील.

* शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने खुली राहतील.

* क्रीडा/शुटींग आदी  आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.

* सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.

* विवाह व अंत्यंस्कारसाठी फक्त ५० लोकांची परवानगी.

* निवडणुका सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी

* कृषी संबंधीत दुकाने व कामे पूर्ववत परवानगी

* बांधकाम सुरु राहतील

* जीम/सलून/ब्युटी पार्लर ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.

* सार्वजनीक वाहतूक पुर्णपणे सुरू

*माल वाहतूक पुर्ववत सुरू

* आंतर जिल्हा प्रवास खुला करण्यात आला असला तरी जिथे संसर्ग आहे त्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास आवश्यक राहील.

* उद्योग पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार.

* सार्वजनीक ठिकाणी वावरणे कोणतीही बंदी नाही.
* कृषी विषयक कामे व दुकाने नियमीतपणे सुरू.

* ई-कॉमर्सचे व्यवहार नियमीतपणे सुरू राहणार.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक संस्था आणि खासगी कोचींग क्लासेस यांच्याबाबत मात्र या निर्देशांमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. यामुळे क्लासेस पुढे देखील बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आठवडे बाजारांबाबतही यात कोणताही उल्लेख नाही. म्हणजेच नियमीत बाजार सुरू राहणार असले तरी आठवडे बाजारांवरील बंदी मात्र कायम असणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी अनलॉकचे निर्देश जारी करतांना नागरिकांनी आधीप्रमाणेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनीक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर, फिजीकल डिस्टन्सींग, सॅनिटायझेशन आदींचे नियम पाळावे लागणार आहेत. जळगाव जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटीचा दर कमी असल्याने अनलॉक करण्यात आलेले आहे. तथापि, भविष्यात हा दर पाच टक्क्यांच्या वर गेल्यास पुन्हा निर्बंध लावण्यात येणार असल्याचेही यात स्पष्टपणे सांगितलेले आहे.

Share post
Tags: collectercorona related newsnew order collecterजिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची टास्क फोर्ससोबत बैठक
Previous Post

भटक्या कुत्र्यांचा त्रास ; महिन्याभरात जीएमसी मध्ये २६९ जणांनी घेतले इंजेक्शन

Next Post

लोकसंघर्ष मोर्चाने साजरा केला शिवराज्याभिषेक दिन

Next Post
लोकसंघर्ष मोर्चाने साजरा केला शिवराज्याभिषेक दिन

लोकसंघर्ष मोर्चाने साजरा केला शिवराज्याभिषेक दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group