Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भटक्या कुत्र्यांचा त्रास ; महिन्याभरात जीएमसी मध्ये २६९ जणांनी घेतले इंजेक्शन

by Divya Jalgaon Team
June 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
भटक्या कुत्र्यांचा त्रास ; महिन्याभरात जीएमसी मध्ये २६९ जणांनी घेतले इंजेक्शन

जळगाव – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागांमध्ये मे महिन्यात २६९ नागरिकांनी कुत्रे चावल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व उपचार घेतले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित झालेले आहे. मात्र नेत्र कक्ष (सी १) येथे आपत्कालीन विभाग सुरू ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी अपघात, हाणामारी, विषप्राशन व संबंधित रुग्ण प्राथमिक उपचार करण्यासाठी येत असतात. त्यासह भटक्या कुत्र्याचा चावा यावरही उपचार घ्यायला येतात. जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ वाढला आहे. या आपतकालीन विभागांमध्ये मे महिन्यात एकूण २६९ व्यक्तींना कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात २०२ पुरुष, ४२ महिला, तर २५ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणार्‍यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. तसेच महिन्याभरात ६ रुग्णांना उंदीर, मांजर, डुक्कर व अन्य प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

अशी घ्या काळजी
नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ व भरपूर पाण्याने जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. आपत्कालीन विभागाला कक्ष क्र. सी १ मध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे यांनी केले आहे.

Share post
Tags: #Jalgaon Civil HospitalDivya Jalgaondivya latest newsJalgaon newsशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऐतिहासिक बॉयलर मशीन !
Previous Post

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ‘शिवक्रांती’ तर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन

Next Post

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवार पासून दिले नवीन आदेश

Next Post
18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवार पासून दिले नवीन आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group