जळगाव – येथील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शिवराज्यभिषेक दिनानिमित्त दरवर्षाप्रमाणे ‘शिवक्रांती’ मित्र परिवारा तर्फे पुष्पहार अर्पण करून शिवप्रेमींनी कोविड -19 च्या नियमांचे पालन करत अभिवादन केले. यावर्षी उपक्रमाचे हे 13 वे वर्ष होते.
याप्रसंगी योगेश देशमुख, हेमचंद्र काळुंखे, शरद राजपूत, रवि भगत, दुर्गेश चौधरी, प्रकाश वाघ, फारुख तांबोळी, विजय मालुसरे, योगेश पाटील, समाधान पाटील, संदीप पाटील, अशोक काळे, अक्षय साळुंखे, गणेश देशमुख, उमेश ढमाळ, प्रितेश देशमुख इत्यादी उपस्थित होते.