जळगाव – जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक पार्क, जैन हिल्स, जैन फूडपार्क व टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क अशा विविध आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कंपनीचे अधिकारी व सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपण केवळ इव्हेंटपुरता न ठरता खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे जतन करण्यासाठी वृक्ष जगविण्याचा संकल्प कंपनीच्या सहकाऱ्यांनी घेतला.
जैन प्लास्टिक पार्क
जैन प्लास्टिक पार्क येथे भोकर, शिरम, कांचन, नीम, वड आदिंचे वृक्षारोपण केले. आजचे वृक्षारोपण प्रातिनिधी स्वरूपाचे असून नजिकच्या काळात मोकळ्या जागी, रस्त्याच्याकडेला सुमारे साडेपाचशे हून अधिक झाड लावले जातील. या कार्यक्रमास आर.एच. काकडे, अतिनकुमार त्यागी, योगेश बाफना, व्ही.एम. भट, ए.ओ. मुंगड, हेमंत तारकर, राजश्री पाटील, आनंद बलोदी, सुरेंद्र नारखेडे आदि सहकारी उपस्थित होते.
टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा
टिश्युकल्चर पार्क इ ब्लॉकमध्ये आज प्रातिनिधीक स्वरुपात ५० वृक्षरोपण केले गेले. यात फायटो सॅनेटायझेशनचे इन्स्पेक्टर डॉ. राम सिंग या पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. यावेळी विजयसिंग पाटील, के.बी. पाटील, सिक्युरिटी ऑफिसर इंद्रकुमार सिंग आदि सहकारी उपस्थित होते.
जैन फूड पार्क व जैन हिल्स
जैन व्हॅली येथील ईसीआरसी वेअर हाऊसच्या परिसरात सुमारे दीडशे रोपे लावण्यात आले. याच परिसरात यथावकाश सुमारे ३ हजाराहून अधिक वृक्षारोपण केले जाणार आहेत. या कार्यक्रमास एस.डी. गुप्ता, डी.जे. शितोळे, जी.आर. पाटील, जी.आर. चौधरी, एस.बी. ठाकरे, बी.व्ही. बडगुजर, प्रमोद शिंदे, दीपक कापसे, योगेश पवार आदी सहकारी उपस्थित होते. जैन हिल्स येथे देखील सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल ढाके, डॉ. बी.के, अजय काळे, रवी कमोद, संजय सोनजे, प्रसाद साखरे आदि सहकारी उपस्थित होते.