पाचोरा (अनिल येवले) – महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्हा पाचोरा येथील सावित्रीबाई शिंदे या प्राथमिक शाळेत आदर्श शिक्षिका सुवर्णा पाटील या कार्यरत असून त्या शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात हिरारीने भाग घेतात कुठलेही कार्यक्रम असो त्या सर्वांना मार्गदर्शन करतात त्यांना लहानपणापासून रांगोळी काढण्याचा छंद होता त्यांनी तो छंद कायम जोपासत त्यांनी कोरोना काळात जनजागृतीसाठी रांगोळीच्या माध्यमातून कसे नियम पाळायचे यावर आधारित रांगोळी काढून जागृती केली होती.
तसेच त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांचे हुबेहुब प्रतिकृती तयार केली होती तसेच 26 जानेवारी व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या उत्कृष्ट रांगोळी तयार केलेली त्यांच्या या कला गुणांमुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचे मंत्री श्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या या सर्व कामाची दखल आंध्र प्रदेश सरकार व तामिळनाडू सरकार यांनी संयुक्तपणे श्री रवींद्रनाथ टागोर सेवा पुरस्कार शिक्षिका सुवर्णा पाटील यांना देण्यात आला तसेच त्यांना जळगाव जिल्ह्यातील तीन पुरस्कारही देण्यात आले आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल पाचोरा शहर नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.