Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तौते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकार करणार २५० कोटींची मदत

by Divya Jalgaon Team
May 26, 2021
in राज्य
0
तौते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकार करणार २५० कोटींची मदत

मुंबई, वृत्तसंस्था । तौते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांसाठी सरकारने आता मोठे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

या चक्रीवादळ ग्रस्तांसाठी २५० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन निर्णयही उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळावेळी काढण्यात आलेला शासन निर्णय याही वादळाच्या नुकसान भरपाईसाठी लागू करण्यात आला आहे. तसंच एनडीआरएफच्या निकषांपेक्षा १८० कोटी अधिकचे राज्य सरकारच्या तिजोरीतून कोकणवासीयांना देण्यात येणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. यासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं आम्ही ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे तौते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार : मुख्यमंत्री

दरम्यान, या नुकसान भरपाईबद्दल विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली…किती वेळ? फक्त तीन तास…तीन तासाचा हा दौरा केला. दोन दिवसांत भरपाई देणार म्हणाले..दिली का? का नाही दिली अजून…भरपाईची ठोस रक्कम अजूनही का जाहीर केलेली नाही? असे अनेक सवाल नारायण राणेंनी या सरकारवर उपस्थित केले आहेत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले होते, “या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालावरुन राज्य सरकारला काही द्यायचंच नाही असं दिसून येत आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये ह्या अहवालातली नुकसानाची आकडेवारी जाहीर केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “कोकण विभागीय आयुक्तांकडून तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.”

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, २६ मे २०२१

Next Post

पाचोरा ची सुवर्णा पाटील शिक्षिका यांना श्री रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने सम्मानित

Next Post
पाचोरा ची सुवर्णा पाटील शिक्षिका यांना श्री रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने सम्मानित

पाचोरा ची सुवर्णा पाटील शिक्षिका यांना श्री रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने सम्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group