Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

by Divya Jalgaon Team
May 21, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

जळगाव – कोरोना काळात अनेक नागरिकांना/रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध न होणे, इंजेक्शनचा तुटवडा आदि समस्या भेडसावत आहे. आजही कोविडचे बरेचसे रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध व्हावे या दृष्टिने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णांसाठी ७ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत.

या मशिनचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री प्रेम कोगटा, श्री संजय बिर्ला, श्री संजय नारखेडे, डॉ. नितीन चौधरी, डॉ. धर्मेंद्र पाटील, रा.स्व. संघाचे देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख श्री स्वानंद झारे, प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री योगेश्वर गर्गे, श्री रत्नाकर पाटील, श्री सचिन चोरडिया, श्री नंदू अडवाणी, श्री शरद कोत्तावार, श्री भानुदास येवलेकर, श्री हेमंत भिडे, श्री सागर येवले उपस्थित होते.

सदरची मशीन केशवस्मृतीच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे त्यांनी रुग्णास ऑक्सिजन ची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजन ची गरज आहे त्याचा तपशील, ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील, मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर केशवस्मृतीस परत करावयाचे आहे.

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी मुंबई स्थित सेवा इंटरनॅशनल व पुणे येथील मुकुल माधव फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरज असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रोहन सोनगडा (९९२१४७२७६६) किंवा केशवस्मृती प्रतिष्ठान ०२५७ २२३६१६६/६९ येथे संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Share post
Tags: Divya Jalgaonऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्धकेशवस्मृती प्रतिष्ठान
Previous Post

जिल्ह्यात आज ७५६ जणांची कोरोनावर मात, ४१० रुग्ण बाधित

Next Post

महाराष्ट्र सरकारने आता शेतकऱ्यांना दहा हजारांचे अनुदान द्यावे

Next Post
कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच द्यावे - खा. उन्मेश पाटील

महाराष्ट्र सरकारने आता शेतकऱ्यांना दहा हजारांचे अनुदान द्यावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group