जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये ७४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर आज नव्याने ४१० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. तसेच आज ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव शहर-३०, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-२७, अमळनेर-२६, चोपडा-४२, पाचोरा-४५, भडगाव-५, धरणगाव-१४, यावल-५, एरंडोल-३, जामनेर-४४, रावेर-२२, पारोळा-१०, चाळीसगाव-४८, मुक्ताईनगर-४३, बोदवड-२४ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ४१० बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ३७ हजार ५४६ बाधित रूग्ण आढळलेत त्यापैकी १ लाख २६ हजार २८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८ हजार ७८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.