Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in गुन्हे वार्ता, राज्य
0
mumbai crain accident news

मुंबई : मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या क्रेनचा भीषण अपघात झाला. यात बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. ही मेट्रोची क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे येथे घेऊन जात होते. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात क्रेनचे दोन तुकडे झाले.मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू.

मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज सकाळी 6 वाजता मेट्रोची क्रेन कोसळून भीषण दुर्घटना घडली. मेट्रोची क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे या ठिकाणी घेऊन जात होते. मात्र चालकाचे क्रेनवर नियंत्रण सुटल्याने ती क्रेन मेट्रोच्या पिलरला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की त्या क्रेनचे दोन तुकडे झाले. अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ हा अपघात झाला.मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू.

यावेळी बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या अंगावर त्या क्रेनचा एक भाग कोसळला. त्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. फाल्गुनी पटेल असे या मृत महिलेचे नाव सांगितले जात आहे. या महिलेसोबत बस स्टॉपवर उभे असलेले इतर दोन व्यक्तीही जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर क्रेनच्या चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या चालकाविरुद्ध इतर कारवाईचे आदेश नेण्यात आले आहेत.

अजून वाचा 

धक्कादायक: व्हेंटिलेटरवर असलेल्या तरुणीवर बलात्कार !

Share post
Tags: Crane AccidentMumbai Metro Crane accident Women Died at AndheriMumbai NewsWomen Deathक्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यूमुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात
Previous Post

भाजपचा एकही लोकप्रतिनिधी पक्ष सोडणे अशक्य – गिरीश महाजन

Next Post

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने, चांदी महागले, जाणून घ्या दर

Next Post
today gold rate news

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने, चांदी महागले, जाणून घ्या दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group