नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गुडगांवच्या फोर्टिस रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या एका तरुणीचा बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत बलात्कार एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतलेय.
पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे २१ ऑक्टोबरला गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तब्येत बिघडल्यावर २२ ऑक्टोबरला तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हॉस्पीटलमध्ये तिच्या बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
२२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान तिच्यावर बलात्कार झाला.पीडितेला शुद्ध आल्यानंतर २८ ऑक्टोबरला तिने आपल्या वडिलांना आपबीती सांगितली. आरोपीचे नाव विकास आहे. या गुन्ह्यात आरोपीची हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्याने मदत केल्याचा संशय आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी २९ ऑक्टोबरला गुन्ह्याची नोंद केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघां संशयिताना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.