जळगाव – जिल्हा परिषद मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.भिमाशंकर जमादार साहेब यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष आर. एस. अडकमोल, जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर, राज्य उपाध्यक्ष सुनील निकम, राहुल तायडे, जिल्हा सचिव मिलिंद लोणारी, उपाध्यक्ष बापू वाघ, कोषाध्यक्षा विजया पाटील, कार्याध्यक्ष मोहन टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे, विभागीय अध्यक्ष जे बी ननावरे, महिला अध्यक्ष जोती घुले, वैशाली सुतार, दिलीप पाटील, देवानंद पाटील, कोमल नेरकर, योगीराज लोहार, आदी उपस्थित होते
यावेळी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे , डॉ. शांताराम ठाकूर, डॉ. अभिषेक ठाकूर देखील उपस्थित होते, त्यांचे देखील पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रथमतः आरोग्य कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संजय ठाकूर यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावण्याचे ठोस आश्वासनही दिले.