जळगाव- जश्णें ईद – ए – मिलादू न्नबी निमित्त दर साल स. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
परंतू सध्या कोवीड १९ मुळे सर्व कार्यक्रम रद्द करून त्या पैशांनी एक आगळी वेगळी पद्धतीने ईद साजरी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बहुल गाव, वस्ती व तांड्यावरील गरीब लोकांना थंडी पासून बचाव होण्यासाठी मोफत बाराशे ब्लँकेट वाटपाचे आयोजन करण्यात आलेले असून त्याचे उद्घाटन आज ईद – ए – मिलादुन्नबीच्या शुभ प्रसंगी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या शुभ हस्ते ब्लँकेट ने भरलेली गाडीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. ईद – ए – मिलादुन्नबी ही इस्लामी कॅलेंडर च्या बारा रबिऊल अव्वल ला साजरी होते म्हणूनच बारा या आकड्याला शुभ मानून या वर्षी बाराशे ब्लँकेट वाटप करण्यात येत आहे.
ह्या गाडी बरोबर सय्यद नियाज अली भैय्या फाऊंडेशन चे सदस्य गरजू गरीब लोकां पर्यंत स्वतः जाऊन आपल्या हस्ते ब्लँकेट चे योग्य रित्या वाटप करून समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून गरजू गरीब लोकांना ब्लॅंकेट द्वारे मायेची ऊब देतील.
यावेळी मा. जिल्हाधिकारी सो. अभिजित राऊत साहेब, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी साहेब, फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, नायब तहसीलदार योगेश नन्नावरे, एडवोकेट सागर चित्रे, रियाज अली नियाज अली, नाझिम पेंटर, शफी ठेकेदार, राहुल चौधरी ,सय्यद जावेद, इलियास नूरी, शेख नजिर, इम्तियाज अली, शेख सलमान, शफीक शेख ई. उपस्थित होते.


