जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ५३ रुग्ण नव्याने आढळून आले आहे तर १३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल प्रमाणे आजही चार तालुके निरंक असल्याचे अहवालात दिसून येत आहे.
जळगाव शहर -१६, जळगाव ग्रामीण २, भुसावळ-४, अमळनेर-८, चोपडा -२, पाचोरा-०, भडगाव -४ धरणगाव -०, यावल-४, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-०, पारोळा -४, चाळीसगाव -४, मुक्ताईनगर-२, बोदवड-२ असे एकूण ५३ कोरोना बाधित आढळून आलेत.
जिल्ह्यात एकूण ५३ हजार १४९ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५० हजार ९९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. उर्वरित ८९३ रुग्ण उपचार घेत आहे. आज नव्याने ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा आकडा १ हजार २६५ वर पोहोचली आहे तर रिकव्हरी रेट ९५.९४ टक्के इतका झालेला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज देण्यात आला आहे.