Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने, चांदी महागले, जाणून घ्या दर

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in राज्य
0
today gold rate news

मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोनं आणि चांदीचे दर पुन्हा वाढले आहेत. शुक्रवारी MCX वर सोन्याचा व्यवहार ४१८ रुपयांनी वाढून ५० हजार ७०० रुपयांपर्यंत प्रति १० ग्रॅमवर झाला. दिवसाच्या अखेरीस १७० रुपयांनी खाली बंद झालं. गुरुवारी सोनं ५० हजार २८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. तरीही सोनं आपल्या सर्वाधिक स्तराहून ६ हजारांनी स्वस्त आहे.दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने, चांदी महागले, जाणून घ्या दर.

चांदीच्या किंमतीत शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. चांदीचा व्यवहार ७४८ रुपयांनी वाढून ६० हजार ९२० रुपये प्रति किलो वर बंद झाला. दरम्यान इंट्रा डे मध्ये चांदीचा भाव ६१ गजार ३२६ रुपयांपर्यंत पोहोचला.दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने, चांदी महागले, जाणून घ्या दर.

डॉलरच्या किंमतीमध्ये झालेली घसरण आणि अमेरिकी प्रोत्साहन पॅकेजला लागलेला उशीर यामध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्योरीटीजचे वरिष्ठ एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले.

जर तुम्हाला वाटत असेल दिवाळीपर्यंत सोन स्वस्त होईल तर ते चूक ठरु शकतो असे मोतीलाल ओस्वाल फायनान्स सर्विसचे कमोडीटी वॉइस प्रेसिडेंट नवनीत दमानी यांनी सांगितले. सोन्याचा दर उंचावरुन खाली येत ५० हजारपर्यंत आलाय. तर चांदी ६० हजारांच्या घरात आहे. येणाऱ्या काळातही हा चढउतार सुरु असेल. दिवाळीपर्यंत सोनं ५० ते ५२ हजार प्रति १० ग्रामच्या रेंजमध्ये असेल असे सांगितले जातंय.

गेल्या दोन महिन्यात रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट दिसून येतेय. रुपया सध्या ७३ ते ७४ रुपये प्रति डॉलर आहे. कोरोना प्रादुर्भावापासून तो ७८ रुपये प्रति डॉलर पोहोचला होता. डॉलरमध्ये तेजी आली तर सोन्याचे दर वेगाने वाढतील. पुढच्या वर्षीपर्यंत सोनं ६० ते ७० हजार प्रति १० ग्रामपर्यंत पोहोचू शकते.

आता जगभरात लॉकडाऊननंतर अनलॉकला सुरुवात झालीय. सर्वच देश अर्थव्यवस्था मजबूत करण्यास लागले आहेत. पुढच्या वर्षापर्यंत डॉलर मजबूत होण्यासोबत सोन्याच्या दरात अचानक उसळी पाहायला मिळू शकते असे विशेतज्ञ सांगतात.

अजून वाचा 

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

Share post
Tags: Gold- Silverlatest newsMarathi NewsMumbai NewsPriceRAteTodayचांदी महागलेजाणून घ्या दरदोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने
Previous Post

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

Next Post

शुभमंगल सावधान! काजल अग्रवालचा विवाहसोहळा संपन्न

Next Post
bollywood news

शुभमंगल सावधान! काजल अग्रवालचा विवाहसोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group