Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपचा एकही लोकप्रतिनिधी पक्ष सोडणे अशक्य – गिरीश महाजन

भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in जळगाव, राजकीय
0
कुणी पक्षातून गेल्याने काहीही परिणाम होणार नाही- महाजन

जळगाव – भाजपचा एकही लोकप्रतिनिधी पक्ष सोडणे अशक्य – गिरीश महाजन. भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही, असा विश्वास आमदार गिरीश महाजन यांनी चोपडा येथे आयोजित शुक्रवारी भाजपच्या बैठकीत व्यक्त केला.

 

जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे. चोपडा तालुक्यात दोन सभापतीपद भाजपकडे आहेत. तालुका बैठकीत विजय पुराणिक, संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे आदी उपस्थित होते. एका विचारधारेवर पक्ष चालत असून पक्ष वाढविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतल्याचे महाजन यांनी सांगितले. मी आहे म्हणून पक्ष असल्याचे म्हणणारे आता इतिहासजमा झाले आहेत. आजही जे भाजप सोडत आहेत,भाजपचा एकही लोकप्रतिनिधी पक्ष सोडणे अशक्य – गिरीश महाजन.

त्यांचीही दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही महाजन यांनी  नमूद केले. पुराणिक यांनी करोना काळात भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन काम के ल्याचे सांगितले. मोदी सरकारने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना आणल्या. या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. रक्षा खडसे यांनी आपण भाजप विचारसरणीत वाढलो असून चार वर्षांत खासदारकीचे तिकीट मिळो ना मिळो, आपण भाजप सोबतच राहणार, असे सांगितले.

अजून वाचा 

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी?

Share post
Tags: BJP BaithakChopdaEknathrao KhadseJalgaonMLA Girish MahajanPolitical NewsPolitical Workers
Previous Post

संत मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामास शुभारंभ

Next Post

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

Next Post
mumbai crain accident news

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group