मुक्ताईनगर – संत मुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी मुक्ताईनगर या साखर कारखान्याचा सातवा बॉयलर अग्नी प्रदिपन व गळीत हंगाम २०२०-२१ चा शुभारंभ पार पडला. एकनाथराव खडसे व मंदाताई खडसे यांच्या शुभहस्ते तर बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा संत मुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी मुक्ताईनगर उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी चेअरमन शिवाजीराव जाधव, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैया पाटील, माजी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्षा नजमाताई तडवी, विनोद तराळ आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प. सदस्य कैलास सरोदे, निलेश पाटील, वैशाली तायडे, वनिता गवळे, बोदवड पं.स. सभापती किशोर गायकवाड, पं.स. सदस्य राजेंद्र सावळे, विनोद पाटील, प्रदीप साळुंखे, गणेश पाटील, ईश्वर राहणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, साहेबराव सिंगतकर, विशाल खोले महाराज, शाहिद खान, किशोर चौधरी, वसंत पाटील, कल्याण पाटील, देवेंद्र खेवलकर, आबा माळी, दिपक झाबड, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, हाजी मुन्ना तेली, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, शिवाजी पाटील, रामभाऊ पाटील, राजू माळी, विश्वनाथ चौधरी, बी.सी. महाजन, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते
याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल मी सर्व प्रथम त्यांच स्वागत, अभिनंदन करतो. मुक्ताई साखर कारखाना हा गेल्या ६ वर्षांपासून नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत सुरू असून नेहमी एफआरपी पेक्षा जास्त भाव देऊन तत्काळ उसाचे पेमेंट अदा करतो त्याबद्दल चेअरमन शिवाजी जाधव, व्हा चेअरमन रोहिणी खडसे यांचे अभिनंदन करतो.
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले, गेले ३० वर्षांपासून मी आमदार आहे, मंत्री राहून गेलो त्यामुळे आता पदाची अपेक्षा नसून मी मतदारसंघात, जिल्हयात सुरू केलेले आणि प्रस्तावित केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पक्षांतर केले आहे.
तसेच सरासरी साखर उतारा हा १०.६८ टक्के मिळाला व कारखान्याच्या सहविज निर्मीती प्रकल्पातुन एकुण १,०४,५३,७०० युनिट विज निर्मीती होवून त्यापैकी कारखान्याचा विज वापर ४२,००,७०५ युनिट झाला असुन उर्वरीत ६३,५६,७४५ युनिट विज हि महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण मंडळास निर्यात केली आहे.