Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव शहरातील नाथवाड्यात दोन तरूणांवर चाकू हल्ला

by Divya Jalgaon Team
October 30, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

जळगाव – शहरातील नाथवाड्या मध्ये  तिघांनी दोन जणांना बेदम मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना गुरूवारी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नाथवाडा येथील कालभैरव मंदिराजवळ मुक्ताबाई एकनाथ जोशी या कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. मुलगा हिरामण एकनाथ जोशी हा रिक्षा चालवून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतो. २५ ऑक्टोंबर रोजी गल्लीतील जोगेश्वर दुर्गादेवी मित्र मंडळाजवळ मुक्ताबाई, त्यांचा मुलगा हिरामण तसेच परिसरातील गणेश सोनार, मधूकर सोनार, उषाबाई सोनार व काही महिला उभ्‍या होत्या.

तेव्हा रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास विशाल दत्त सोनवणे, हा त्याचे मित्र साहिल अकबर तडवी, पिंट्या तडवी (सर्व रा. नाथवाडा) यांना घेवून मंडळाजवळ आला. नंतर हिरामण याची कॉलर धरून तु स्वत:ला या एरियाचा दादा समजतोस का?..,या एरियाचा मी दादा आहे, असे म्हणत त्याला मारहाण केली. नंतर साहिल व पिंट्या यानेही मारहाण केली.

मित्र हिरामण याला तिघे मारत असल्याचे दिसताच, गणेश सोनार हा त्यास वाचविण्‍यासाठी धावला. मात्र, त्यालाही तिघांनी मारहाण केली. नंतर विशाल याने गणेशच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर भांडण सोडविण्‍यासाठी मुक्ताबाई आल्या असता, त्यांच्या हाताला सुध्दा विशाल याने चावा घेतला व नंतर बंदूकीने गोळ्या झाडून मारूण टाकण्‍याची त्याने धमकी दिली.

अखेर या प्रकरणी शुक्रवारी मुक्ताबाई जोशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात मारहाण करणा-या तिघांविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonJalgaon crime newsMarathi News
Previous Post

फ्रान्सशी असलेले संबंध तोडा- मुस्लिम समाज मंचची

Next Post

संत मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामास शुभारंभ

Next Post
muktainagar sakhar karkhana

संत मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामास शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group