जळगाव, प्रतिनिधी । जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव शहरात रेड प्लस बँक येथे ३० दिव्यांग मुलांना नगरसेविका निता सोनवणे यांच्या किराणा वाटप करण्यात आला आहे.
जनमत प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रेड प्लस ब्लड बँक येथे 30 दिव्यांग मुलांना नगरसेविका निता सोनवणे यांच्या हस्ते किराणा व मास्क वाटप करण्यात आले, याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, संस्थेस निलेश शांताराम पाटील, वर्षा अहिरराव, पोलीस सेवा संघटनेचे हर्षाली पाटील, जिल्हा न्यायालयाचे प्रकाश सपकाळ, सागर कोळी, अरूनाई बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल कोळी, राजेंद्र कुमार वर्मा, संजय कुमार सिंग, मार्केट स्पेशलचे मुख्य संपादक हेमंत वैद्य यांचे सहकार्य लाभले.