जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ५२१ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ११ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हाभरात आज ६६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर- ५१, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ, ५१, अमळनेर-४, चोपडा-५४, पाचोरा-३, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-३७, एरंडोल-१९, जामनेर-७०, रावेर-५०, पारोळा-१५, चाळीसगाव-७०, मुक्ताईनगर-४४, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातील ९ असे एकुण ५२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ३६ हजार २८५ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २४ हजार ३४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित ९ हजार ५०१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ११ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.