जळगाव, प्रतिनिधी । पिंप्राळा येथील प्रल्हाद नगर परिसरात भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय जप व हवनाचे आयोजन आज सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्यात आले होते.
तसेच हवनासाठी बाबासाहेब भगवान बसुगडे सपत्निक बसले होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य वे. शा. स. परमेश्वर धर्माधिकारी, अक्षय रविंद्र जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ललित जाधव व आरती जाधव, विद्या जगताप, विजया धर्माधिकारी, हेमलता जोशी, हर्षादा कुळकर्णी, मलकापूरकर साहेब आदींनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आध्यात्मिक आघाडीचे महानगर अध्यक्ष हेमंत जोशी यांनी केले होते.