जळगाव – जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील आज १७ रोजी सकाळी १० वाजता पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टिपर्पज हॉल दियेथे व्यांग बांधवांसाठी लसीकरण व मास्कचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांचे संकल्पनेतुन जळगाव जिल्हयातील दिव्यांग बांधवांसाठी कोविड लसीकरण व मास्क वितरण कार्यक्रम आज रोजी दि. १७ रोजी सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. नागेश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव उपस्थित होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गनी मेमन उपाध्यक्ष रेडक्रॉस, जळगाव रजणीकांत कोठारी के.के.कॅन्स् जळगाव, विनोद बियाणी सचिव रेडक्रॉस, दिलीप पाटील प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह), जळगाव, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, रा. पो. उपनिरीक्षक भारत चौधरी असे उपस्थित होते. आज रोजी सुमारे 50 दिव्यांग बांधवाना लस दिली गेली आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित माळी यांनी केले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक फौजदार रावसाहेब गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सतीश देसले, दीपक सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर केंद्रावर ज्यावेळी लसीकरण करण्यात येईल त्याच्या वेळी दिव्यांग बांधवांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.