Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरणासह विविध घटकांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

by Divya Jalgaon Team
May 17, 2021
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव, – सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अन्नधान्य पिके, व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 20 मे, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 20 मे, 2021 पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच यासाठी विचार केला जाणार असल्याचे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, व व्यापारी पिके कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यात कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य, व्यापारी पिके (कापूस) राबविण्यात येतो. बियाणे वितरण – कडधान्य बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु 50/- प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 25/- प्रती किलो, संकरीत मका व बाजरी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु. 100/- प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु 30/- प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 15/- प्रती किलो एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

पीक प्रात्यक्षिके – पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. दोन ते चार हजार रुपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.

बियाणे मिनिकिट – सोयाबीन/बाजरी/ज्वारी/कापूस/मका या पिकांमध्ये मिनिकिट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्याकरीता तूर, मुग या पीकाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021 मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे 4 किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. तूर 412/- रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, मुग -407/- रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, उडीद 349/- रुपये प्रती 4 किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय राहील. बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Previous Post

जिल्हा पोलीस दलातर्फे दिव्यांग बांधवांसाठी कोविड लसीकरण व मास्क वाटप

Next Post

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group