मुंबई, वृत्तसंस्था । अमेरिकन बाँड यील्डमध्ये चढउतार, अमेरिकेच्या किरकोळ विक्रीत कोणताही बदल झालेला नाही आणि आशियातील बर्याच भागांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याने सोन्याच्या भावात (Gold Rate) सलग तिसर्या दिवशीही वाढ झालेली पाहायला मिळाली.
MCX वर सकाळी 10.32 वाजता एमसीएक्सवर सोन्याचे भाव 317 रुपयांनी वाढून, 47993 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर ट्रेड करत होते. त्याचप्रमाणे ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचा दर दहा ग्रॅम मागे 360 रुपयांनी वाढून 48518 रुपये झाला आहे
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या भावांत वाढ होताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी ही तेजी पाहायला मिळत आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 16.45 डॉलरच्या तेजीसह प्रति औंस 1,854.55 डॉलर होता. सोन्याप्रमाणेच चांदीमध्येही तेजी दिसून येत आहे. जुलै डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव 0.417 डॉलरने वाढून प्रति औंस 27.782 डॉलरवर होता.
एमसीएक्सवर चांदीची किंमत
देशांतर्गत बाजारातही चांदीत तेजी दिसून येत आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. यावेळी, एमसीएक्सवरील चांदी 914 रुपयांच्या वाढीसह 71999 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत होती. सप्टेंबर डिलिव्हरीसाठीच्या चांदीची किंमत 861 रुपयांनी वाढून 73050 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होती.
मेमध्ये ‘इतकी’ वाढ
जर आपण मागील काही काळातील सोन्या-चांदीच्या किंमतीकडे पाहिले, तर गेल्या आठवड्यात आयबीजेए वेबसाईटवर 24 कॅरेट सोन्याचा बंद भाव 47757 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. 30 एप्रिल रोजी ही किंमत प्रति दहा ग्रॅम 46791 रुपये होती. अशा प्रकारे, मेमध्ये आतापर्यंत किंमती 966 रुपयांनी वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्याचा बंद भाव 47484 रुपये होता. अशाप्रकारे, दर आठवड्याला 273 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या आठवड्यात बंद भाव प्रति किलो 70360 रुपये होता. 30 एप्रिल रोजी ही किंमत 67800 रुपये होती. अशा प्रकारे मेमध्ये आतापर्यंत 2560 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ही किंमत 70835 रुपये होती. त्यात साप्ताहिक आधारावर 475 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.