जळगाव, प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अनेक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील त्याचा ताण निर्माण होताना आपण पाहू शकतो. परंतु या सगळ्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे एका रुग्णाला प्लाझ्माची आवश्यकता होती. त्या रुग्णाचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता, परंतु रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णास एबी पॉझिटिव रक्तगट असून एबी पॉझिटिव्ह प्लाझ्मा देण्यात येत असल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समजली. त्यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे धाव घेत रुग्णालय प्रशासनाला संबंधित डॉक्टरांना याचा जाब विचारला. तसेच उप अधिष्ठाता डॉ. पोटे यांच्याशी देखील चर्चा केली आणि संपूर्ण प्रशासनाला यानंतर असा गैरप्रकार घडता कामा नये अशी तंबी देखील दिली अन्यथा कारवाई करावी लागेल असेही ते यावेळी म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणावर उप अधिष्ठाता डॉ. पोटे यांनी सांगितले की या घटनेस टेक्निशियन जबाबदार असल्याचे सांगत, त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू तसेच यानंतर पुढे अशी घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या जागृतीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला व रुग्णाचे प्राण वाचू शकले. त्तनंतर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.