जळगाव प्रतिनिधी । हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीतील सिद्धार्थनगरात असलेल्या बांधाजवळ एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सचिन पाटील आणि मुकेश पाटील यांनी रविवारी २ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास संशयित आरोपी लखन समाधान सपकाळे (वय-26 रा. बांधाजवळ सिद्धार्थ नगर रामेश्वर कॉलनी) याला अटक केली. त्याच्याकडून २४ इंची लांबीची तलवार हस्तगत केली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात पो.कॉ. मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.