जळगाव, प्रतिनिधी – महाराष्ट्र दिनानिमित्त जयश्री सुनिल महाजन यांच्या सोशल मीडिया सेलचे उदघाटन राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रसंगी महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या समवेत उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा व विष्णू भंगाळे, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, गजानन मालपुरे, तसेच नगरसेवक सुनिल महाजन, नितीन बरडे, प्रशांत नाईक, अनंत (बंटी) जोशी आदी उपस्थित होते. आजच्या या डिजिटल इंडियामध्ये जनसेवा परमो धर्मः हे ब्रीद घेऊन कार्य करीत असताना सोशल मिडियाचा सकारात्मक उपयोग जळगावच्या शाश्वत विकासासाठी नक्कीच मोलाचे ठरणार, असे मत याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.