जळगाव – अरविंद कुमार सजनराज बाफना (जे.जे.उद्योग संचालक) यांचे आज सकाळी १० वा. आजारी असल्याकारणाने निधन झाल्याने दाल मिल व्यापारी परिवारात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने व्यापारी उद्योग समूह ही सुन्न झाल्याने सोशल मीडियावर शोक संदेश दिला जात आहे.
त्यांचे अंतिम संस्कार आज दुपारी ३ वा. नेरी नाका येथील स्म्शान भूमीत केले जाणार आहे. तसेच लॉकडाउनमुळे प्रशासनाने केलेले नियमाचे पालन केले जाणार असून उठावना व बैठक याचे कार्यक्रम केले जाणार नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.