Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये वाढ, आणखी वाढ होण्याची शक्यता

by Divya Jalgaon Team
May 1, 2021
in राष्ट्रीय
0
सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये वाढ, आणखी वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :- काही राज्यांनी कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. आरबीआयच्या माहितीनुसार निर्बंध कायम राहिल्यास मागणी पुरवठा साखळीवर परिणाम होईल. यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. परिणामी महागाईच्या झळा बसू शकतात. भारतातील वायदेबाझार नॅशनल कमोडिटी अँड डेरीवेटिव्स एक्सचेंजनं देशात महागाई वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे 11 महिन्यांमध्ये सोयाबीनचं तेल तब्बल 72 टक्के महागलं आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार सोयाबीन तेल आणखी महागू शकतं. या सर्वाचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होऊ शकतो.

शेतकऱ्यांना फायदा मिळतोय?
सोयाबीनचा भाव मागील वर्षाच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एका क्विंटलला 4500 ते 7000 रुपये या दरम्यान दर मिळाला आहे. काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यापेक्षा कमी किमतीला देखील सोयाबीन विकल्याचं दिसून येतं.

सोयाबीन तेलाचे दर का वाढले?
सोयाबीन तेलाचे दर वाढण्यामागे लोकांची अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवणं ही बाब आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं लॉकडाऊनच्या भीतीनं लोक अतिरिक्त साठा करुन ठेवत आहेत. मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर ताण येऊन किमती वाढत असल्याचं निरीक्षण काही तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय संशोधकांनी सोयाबीनचं नवं वाण तयार केलं आहे. या वाणाचा नाव MACS 1407 हे आहे. पुणे येथील संशोधन संस्थेने सोयाबीनच वाण तयार केलं आहे. या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल सोयाबीनंचं उत्पादन होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना एमएसीएस 1407 वाणाचं बियाणं पुढील हंगामापासून उपलब्ध होणार आहे.

Share post
Tags: #Soyebeen OilMarathi NewsNew DelhiOilPriceआणखी वाढ होण्याची शक्यतासोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये वाढ
Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते सोशल मीडिया सेलचे उदघाटन

Next Post

आनंदाची बातमी : रशियन कोरोनाची स्पुतनिक – V पहिली लस भारतात दाखल

Next Post
आनंदाची बातमी : रशियन कोरोनाची स्पुतनिक – V पहिली लस भारतात दाखल

आनंदाची बातमी : रशियन कोरोनाची स्पुतनिक - V पहिली लस भारतात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group