जळगाव, प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आज २९ एप्रिल रोजी नेरी नाका परिसरातील ३० गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला आहे.
आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर आणि टीम यांनी केलेल्या सर्वेक्षणच्या माध्यमातून नेरी नाका येथील पांचाळ वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक उपासमार होत आहे अशा कुटुंबांना मदत या वेळी करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, चना डाळ, तुरडाळ, तेल, आटा, साखर, चहा पावडर, मीठ, हळद, मिरची पावडर अशा वस्तू पुढील महिनाभरासाठी उपयोगाच्या दृष्टिने देण्यात आल्या. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे संचालक श्री विवेक पलोड यांचे आर्थिक सहकार्यातून शिधा वाटप करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा पलोड, भानुदास येवलेकर, सागर येवले, कुणाल शुक्ला, हर्षल दुसाने उपस्थित होते.