मेष:- अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. मित्रांशी मतभेद संभवतात. काही गोष्टी अचानक घडतील. मानसिक ताणतणाव जाणवेल.
वृषभ:- जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस शांततेत जाईल. घरात तुमचा दबदबा राहील. संपर्कातील लोकांची मदत मिळेल.
मिथुन:- उगाच चीड चीड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आत्मविश्वास सोडू नका. उष्णतेचा त्रास जाणवेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
कर्क:- जुनी इच्छा पूर्ण होईल. कमिशनमधून फायदा होईल. कामात कल्पकता दाखवाल. व्यवहारात चोख राहाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.
सिंह:- प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तीचे धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. हातून चांगले लिखाण होईल. बौद्धिक छंद जोपासाल.
कन्या:- बुद्धीला ताण द्यावा लागेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा त्रास जाणवेल. भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.
तूळ:- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात. घरगुती वस्तु खरेदी कराल.
वृश्चिक:- आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल. हातातील अधिकार वापराल. मानापमानाला सामोरे जाल.
धनू:- मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. फार काळजी करत बसू नका. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.
मकर:- आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्या कडील अधिकाराची जाणीव ठेवावी. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.
कुंभ:- उगाच चीड चीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मीन:- चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल. इतरांचे कौतुक कराल. कलेची आवड जोपासाल. मनाजोगी खरेदी केले जाईल.