नवी दिल्ली, वृत्तसंस्था :- भारतीय बाजारपेठांमध्ये आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today ) प्रचंड घसरण झाली. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमती 505 रुपयांनी खाली आल्यात. राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत आता प्रति 10 ग्रॅम 46,518 रुपये झाली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 47,023 रुपयांवर बंद झाले. (Gold Price Today: Gold-Silver Cheap 28 april 2021 Once again, check the price of 10 grams of gold rate silver rate)
सोन्याची किंमत प्रति औंस 1,769 डॉलरवरून खाली
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,769 डॉलरवरून खाली आलीय. याशिवाय अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (एफओएमसी) बैठकीपूर्वी डॉलरच्या सुधारणेमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव होता. यामुळेच भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या भावात घसरण झाली.
चांदीचे दरही पडले
चांदीच्या भावातही आज घसरण दिसून आली. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचे दर 828 रुपयांनी घसरून 67,312 रुपयांवर गेले. यापूर्वी चांदी 68,140 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी प्रति औंस 26.02 डॉलर होती. चांदीमध्ये फारसा फरक नव्हता.
दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर किंमत खाली
आठवड्यातील पहिल्या दोन दिवस सोन्याच्या किमती स्थिर असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले आहे. मंगळवारी यूएस यील्डमध्ये वाढ नोंदविण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती खाली आल्यात. याचा परिणाम भारतीय बाजारावरही झालाय.
वायदा बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या
कमकुवत मागणीमुळे व्यापाऱ्यांनी सौदे कमी केले. फ्युचर्स मार्केटमधील सोन्याचा भाव 352 रुपयांनी घसरून 46,951 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून महिन्यात डिलीव्हरीसाठी असलेले सोन्याचे भाव 352 रुपये किंवा 0.74 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 46,951 रुपये झाले.
या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने
या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता. परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने 1,800 डॉलरच्या पातळीवर पोहोचले.
विक्रमी उच्चांकापेक्षा 9000 रुपये स्वस्त
सध्या सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली असली, तरी ती अद्याप विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 9000 रुपये कमी आहे. वास्तविक, कोरोनाच्या पहिल्या लाटेने सोन्याच्या किंमतींमध्ये एक नवीन विक्रम स्थापित केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव 56000च्या पातळीवर गेले होते, ते आता घसरून प्रति दहा ग्रॅम 47 ते 48,000 पर्यंत खाली आले आहे.
सोन्याची किंमत या घटकांवर अवलंबून
सोन्याची किंमत ठरविणार्या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व्ह बँकेने दिलेला दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींबद्दल लोकांमध्ये चर्चा वाढलीय. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमतींमध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.