जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १००६ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर दिवसभरात २० बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ११२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर-१७३, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ-१३०, अमळनेर-६०, चोपडा-९७, पाचोरा-४७, भडगाव-११, धरणगाव-३३, यावल-२५, एरंडोल-७३, जामनेर-३८, रावेर-७०, पारोळा-२०, चाळीसगाव-५०, मुक्ताईनगर-९०, बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार ६ रूग्ण आढळून आले आहे.
कोवीड अहवालात आजपर्यंत १ लाख १९ हजार ९३४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ७ हजार २६ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. उर्वरित १० हजार ७६६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात २० बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.