टाकळी – संपूर्ण देशात कोरोना आजाराने प्रचंड प्रमाणात थैमान घातल्याने राज्यात रक्तसाठा अपूर्ण पडत आहे. याकरीता भाजपा प्रदेश युवा मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. आज टाकळी प्रदे.येथे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रक्तदाते रत्नाकर पाटील ब्राम्हणशेवगे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण, माजी जिप.सभापती पोपट भोळे,जिल्हा उपाध्यक्ष के.बी.साळुंखे, भाजप तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सदस्य दिनेश बोरसे, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे,सरचिटणीस गिरीश ब-हाटे,अमोल चव्हाण, तालुका उपाध्यक्ष आबा बच्छे ,युवा मोर्चा ता.अध्यक्ष सुनिल पवार, आयोजक विशाल सोनवणे, सिद्धार्थ राजपूत, निळकंठ नगर, दिनेश महाजन, पोलीस पाटील पवार,सरपंच मोरे उपसरपंच रोहिदास पवार तसेच जीवन सुरभी ब्लड बँकेचे डॉ. भदाणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.