चिंचोली, जळगाव – येथे टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै. अनिकेत घुले, व अजय शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली येथे माक्स वाटप करण्यात आले आहे.
टायगर ग्रुप भारतचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माक्स वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. यावेळी गौरव उमप, ग्रामपंचायत सदस्य आनंद घुगे, टायगर ग्रुप सदस्य सोपान मानकर, रवींद्र पाटील, गणेश गोपाळ, पवन कोळी, प्रणव लाड, विशाल शेळके, राहुल शेळके, शुभम कोळी, विशाल पाटील, रुपेश घुगे आदी उपस्थित होते.


