चोपडा – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे 14 एप्रिल 2021 रोजी चोपडा, कस्तुरबा हायस्कूल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने यांच्या प्रतिमेला एडवोकेट संदीप पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष के. डी .चौधरी समन्वयक मार्केट कमिटीचे माजी उपसभापती प्रा. नंदकिशोर सांगोरे निवृत्त मुख्याध्यापक अनिल साठे , किसान सेलचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे ,चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील ,युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, एनएसयूआय राज्य सचिव चेतन बाविस्कर, प्रदीप निंबा पाटील ,अहिरे ,मोरे ,इलियास पटेल, संजू पाटील चहार्डी, सपकाळे ,हर्षवर्धन पवार ,कस्तुरबा हायस्कूल चे शिक्षक वृंद, एनसीसी राष्ट्र सेवा दलाचे प्राध्यापक वर्ग आदी याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसने केलेल्या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एडवोकेट संदीप पाटील यांनी रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी राजेंद्र पाटील, पंकज धनगर, अभिजीत पाटील, घनश्याम पाटील ,रोहित चौधरी ,संजोग पाटील, दीपक विसावे, विकास पाटील, अनिल चौधरी ,तुषार धनगर ,प्रवीण पाटील ,किरण पाटील, अशोक बळीराम पाटील, रवींद्र बागुल, दिनेश अहिरे, सचिन सपकाळे, महेश अहिरे ,सोहम सोनवणे ,एकनाथ बाविस्कर ,बुद्धभूषण शिरसाट ,शुभम मोरे, अमोल बागुल, आकाश माळी, अमोल बागुल, सुनील बाघुले ,परेश पवार आदि रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.
या सर्वांचे काँग्रेस कमिटीतर्फे अभिनंदन करण्यात आले यावेळी चोपडा शहर काँग्रेस एन एस यु आय अध्यक्ष हर्षवर्धन किशोर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एडवोकेट संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. कोरोना च्या काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. चोपडा येथील ब्लड बँकेने यावेळी उत्तम सहकार्य केले.